सैनिक कल्याण विभागाअंतर्गत लाभांचे विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या हस्ते वितरण

Rokhthok Maharashtra 3 0

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांच्या पाल्यांना विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लाभांचे धनादेश वितरीत करण्यात आले.

या सर्व योजना सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून राबविण्यात येत असून ध्वजदिन निधीसाठी सढळपणे योगदान द्यावे, असे आवाहन श्रीमती तेली यांनी केले.

यावेळी ९ लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. यामध्ये बचत गट आर्थिक मदतीचा चौथा हप्ता योजनेंतर्गत बारामती येथील गंगोत्री माजी सैनिक महिला बचत गटाला रुपये २ लाख रुपये , सैन्य सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना सदनिका खरेदी करीता आर्थिक सहाय योजनेत श्रीमती निता सचिन फडतरे यांना रुपये २ लाख रुपये , सैन्य सेवेत असताना २३ टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकास मदत योजनेत वसंत दत्तात्रय कानडे यांना रुपये ४९ हजार, १०० टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकांना मदत योजनेत नारायण किसन थोरात यांना रुपये ७५ हजार, माजी सैनिकास स्वयंरोजगारासाठी मदत योजनेत राजाराम मारुती मोहिते यांना रुपये ३ लाख रुपये , माजी सैनिकास सदनिका खरेदी करीता अजित ज्ञानदेव सणस व आवटे अशोक यशवंत यांना रुपये ५० हजार व संतोष नारायण शिंदे यांना रुपये १ लाख रुपये तसेच पाल्य परदेश शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिकास आर्थिक मदत योजनेंतर्गत रामदास नारायण पालेकर यांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत यांनी कळविली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.