सांगलीत बांधकामावर रक्तरंजित थरार! झोपलेल्या मजुराच्या डोक्यात दांडका घालून हत्या

Rokhthok Maharashtra 3 0

 
सांगली जिल्ह्यातील विटा येथे बांधकामावर काम करणाऱ्या दोन परप्रांतीय मजुरांमधील वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत मजुराचे नाव राजमन राजाराम कुम्हार (वय २८) असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तर अशोक कुम्हार याच्यावर हत्येचा आरोप आहे.
माहितीनुसार, दोघांमध्ये कामावरून नेहमीच वाद होत होते. बुधवारी दुपारी राजमन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत झोपला असताना, आरोपी अशोकने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या राजमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी विटा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी बांधकाम मालक दयानंद साबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.