कोल्हापूर हत्या प्रकरणाला नवं वळण! प्रेमसंबंध नव्हे तर पैशांच्या वादातून सुरेखा न्यारे यांची हत्या?

Rokhthok Maharashtra 40 0

कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही हत्या अनैतिक संबंध आणि लग्नाच्या वादातून झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता गावात वेगळीच चर्चा रंगली आहे.
दाव्यानुसार, सुरेखा न्यारे यांनी आरोपी प्रकाश पाटील याला गाडी घेण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आर्थिक मदत केली होती. नंतर ते दागिने सोडवून देण्यासाठी त्यांनी वारंवार पैशांची मागणी केली. याच पैशांच्या वादातून प्रकाशने हत्येचा कट रचल्याची चर्चा सुरू आहे.
आरोपीने पंढरपूरला जाण्याचे आमिष दाखवून त्यांना कारमध्ये बसवले आणि जनावरांच्या शेडमध्ये गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह समुद्रात फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र भाच्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणात नेमके सत्य काय? हत्या प्रेमसंबंधातून झाली की पैशांच्या वादातून? याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.