जेलीफिशचा दंश, 11 शस्त्रक्रिया तरीही हार नाही! पुण्याच्या गीताने 15 तासांत कॅटालिना चॅनेल पार केला

Rokhthok Maharashtra 11 0

जेलीफिशचा दंश… हातावर तब्बल ११ शस्त्रक्रिया… पण पुण्याच्या गीताने हार मानली नाही!
प्रचंड समुद्री प्रवाह, वेगवान वारा, बोचरी थंडी आणि रात्रीचा काळोख… अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुण्याच्या गीता महेश मालुसरे हिने अमेरिकेतील प्रसिद्ध कॅटालिना चॅनेल तब्बल १५ तास २१ मिनिटांत पोहून पार केला.
ही कामगिरी करणारी गीता भारतातील पाचवी महिला ठरली आहे.
विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी येथे समुद्रात पोहत असताना गीताला जेलीफिशचा विषारी दंश झाला. हातावर गंभीर परिणाम झाला आणि तब्बल ११ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे तिचं जलतरण करिअर संपल्याचं वाटत होतं.
पण गीताने जिद्द सोडली नाही. मागील वर्षी इंग्लिश चॅनेल पार केल्यानंतर आता तिने कॅटालिना चॅनेलही पूर्ण केला आहे.
‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळवण्यासाठी तिला जगातील सात प्रमुख खाड्या पार करायच्या आहेत. पुढील आव्हान म्हणून १ ऑक्टोबरला न्यूयॉर्कमधील ४८ किलोमीटरची मॅनहॅटन २० ब्रीजेस स्पर्धा पूर्ण करण्याचे तिचे लक्ष्य आहे.
जखमांवर मात करून समुद्रावर विजय मिळवणाऱ्या गीताला सलाम!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.