हडपसरमध्ये 1 किलोमीटरसाठी 45 मिनिटे! वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी उपाय कधी?

Rokhthok Maharashtra 5 0

हडपसरकरांना नेमकं काय हवंय?
हडपसरमध्ये विकास वेगाने होतोय… पण त्याच वेगाने वाहतूक कोंडीचाही प्रश्न गंभीर होत चाललाय!
हडपसरमध्ये अवघ्या एक किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल ४५ मिनिटं लागत असतील, तर प्रश्न फक्त उड्डाणपुलांचा आहे का?
नवीन उड्डाणपूल बांधले म्हणजे वाहतूक कोंडी सुटणार का? की त्यासोबतच अपूर्ण डीपी रस्ते तातडीने पूर्ण करणे, पर्यायी रस्त्यांचा विकास, अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई आणि प्रमुख चौकांमध्ये योग्य ट्रॅफिक मॅनेजमेंट करणंही गरजेचं आहे?
सकाळी ऑफिसला जाताना असो किंवा संध्याकाळी घरी परतताना… वाहतूक कोंडी आता हडपसरकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरजही आता प्रकर्षाने जाणवतेय.
हडपसरचा विकास होतोय, पण नागरिकांचा प्रवास कोंडीत अडकतोय… मग या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?
तुमच्या मते, हडपसरमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी नेमकी कुठे होते? कमेंटमध्ये ठिकाण सांगा… कारण हा प्रश्न फक्त एका रस्त्याचा नाही, तर संपूर्ण हडपसरकरांच्या रोजच्या जगण्याचा आहे!

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.