महाराष्ट्रात रुग्णालयांसाठी नवा कायदा? पैसे नसले तरी आपत्कालीन उपचार बंधनकारक!
महाराष्ट्रातील रुग्णालयांसाठी लवकरच नवा कायदा येण्याची शक्यता आहे… आणि हा कायदा लागू झाला, तर सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो!
अपघात किंवा गंभीर आजाराच्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल होताना पैशांची मागणी, कागदपत्रांची औपचारिकता किंवा इतर कारणांमुळे उपचारांना उशीर होतो… आणि अनेकदा रुग्णांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायद्यात नव्या तरतुदी आणण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला पैसे नसल्याच्या कारणावरून उपचार नाकारता येणार नाहीत. रुग्णालयांना तातडीने प्राथमिक उपचार देणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.
या कायद्यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक रोखणे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणणे आणि रुग्णांचे हक्क सुरक्षित करणे हा उद्देश आहे.
हे विधेयक यापूर्वी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं होतं. आता हिवाळी अधिवेशनात त्यावर पुढील प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
पैसे नसले तरी आपत्कालीन उपचार मिळणार? हा कायदा मंजूर झाला तर रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो





