हडपसर-मांजरी ‘स्वीकृत’ सदस्यपदासाठी 27 जण पात्र! 3 जागांसाठी कोणाची लागणार वर्णी?

Rokhthok Maharashtra 8 0

हडपसर-मांजरी परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीतील तीन स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी तब्बल 27 अर्ज पात्र ठरले आहेत.
या तीन जागांसाठी एकूण 28 अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीमध्ये रविशंकर विठ्ठल पवार यांचा अर्ज अपात्र ठरला, तर उर्वरित 27 अर्ज पात्र ठरले आहेत.
पात्र उमेदवारांमध्ये हरीभाऊ काळे, सागर प्रभुणे, प्रतीक खेडकर, आकाश डांगमाळी, राहुल शिंदे, दिलीप तुपे, प्रविण प्रधान, सीमा शेंडे, समीर घुले, गौरव म्हस्के, दीपक हिंगणे, गणेश घुले, मनीषा तुपे, अनिल शिंदे, पल्लवी सुरसे, सविता हिंगणे, सचिन हिंगणे, स्मिता गायकवाड, रवींद्र चव्हाण, स्वप्निल तुपे, उर्मिला आरू, रवींद्र होळकर, शुभांगी कांबळे, संकेत शिंदे, रेश्मा जगदाळे, ज्ञानेश्वर कुडले आणि मिलिंद तुपे यांचा समावेश आहे.
विविध सामाजिक आणि बिनसरकारी संस्थांच्या माध्यमातून या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
आता 27 पात्र उमेदवारांमधून त्या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार? याकडे हडपसर-मांजरीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तुमच्या मते या 27 उमेदवारांमधून कोणाची निवड होऊ शकते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.