दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट! आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ₹500 कोटींची मानहानी नोटीस

Rokhthok Maharashtra 9 0

दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय… आणि यावेळी थेट ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिसीमुळे!
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना यूबीटी नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
सतीश सालियन यांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या मृत्यूच्या फेरतपासणीची मागणी केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. त्यामुळे प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा नोटिसीत करण्यात आला आहे.
नोटिसीत ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई, बिनशर्त सार्वजनिक माफी आणि केलेली वक्तव्ये मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला असून आदित्य ठाकरे यांचं नाव एफआयआरमध्ये नमूद आहे; मात्र नावाचा उल्लेख झाला म्हणजे व्यक्ती दोषी ठरली असे होत नाही. तपास सुरू आहे.
आदित्य ठाकरेंनी दिशा सालियन यांना कधीही भेटलो नसल्याचे सांगत, आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
आता ५०० कोटींच्या या नोटिसीनंतर पुढे कायदेशीर कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.