व्यसनमुक्त भारतासाठी पत्रकारांचा पुढाकार; ब्रह्माकुमारींच्या अभियानाला समर्थन.

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बोपोडी सेंटरला भेट देत “दहा कोटी नशामुक्त अभियानाला” जाहीर पाठिंबा दिला. यावेळी नशामुक्त समाज घडवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.

बोपोडी येथील ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी ” १० कोटी नशामुक्त अभियान” या उपक्रमाची माहिती देत, व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात पत्रकारांनी अभियानाला पाठिंबा दर्शवत, समाजात सकारात्मक जनजागृती करण्यासाठी माध्यमांची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी १ ते ३ सप्टेंबरदरम्यान माउंट आबू येथे होणाऱ्या राष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी पत्रकारांना निमंत्रणही देण्यात आले. सकारात्मक पत्रकारिता आणि समाजहिताचे विषय या परिषदेत चर्चिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमात उपस्थितांनी व्यसनमुक्त, निरोगी आणि जागरूक समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.