पुण्याचा MH 12 बदलणार? नितीन गडकरींचा मोठा निर्णय; पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी!

Rokhthok Maharashtra 8 0

पुणेकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी! पुण्याची ओळख बनलेला MH 12 आरटीओ कोड बदलणार का, यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घातलं आहे.
सध्या पुणे आरटीओमध्ये MH 12 ZZ ही शेवटची वाहन नोंदणी सिरीज सुरू असल्याने पुढे काय होणार, याबाबत चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत MH 12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी विनंती केली.
मोहोळ यांच्या माहितीनुसार, गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत MH 12 कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे.
आता पुढे दोन पर्याय चर्चेत आहेत. एक म्हणजे MH-12-AAA-1234 अशा तीन-अक्षरी सिरीज सुरू करणे, तर दुसरा पर्याय MH-12-A1-1234 अशा अल्फान्यूमेरिक पद्धतीचा आहे.
अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसला, तरी पुण्याची ओळख असलेला MH 12 कोड कायम राहण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.