दादा कोंडके यांच्या शेवटच्या क्षणी काय घडलं? 2 तास प्रेताजवळ एकट्या होत्या अनिता पाध्ये!

Rokhthok Maharashtra 4 0

मराठी सिनेसृष्टीला आपल्या भन्नाट विनोदाने आणि अभिनयाने खळखळून हसवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दादा कोंडके.
‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’ आणि ‘राम राम गंगाराम’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
मात्र दादांच्या आयुष्याचा शेवटचा प्रसंग अत्यंत भावूक आणि अस्वस्थ करणारा होता.
१४ मार्च १९९८ रोजी दादा कोंडके यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसिद्ध लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत त्या रात्रीचा प्रसंग सांगितला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे पावणे तीनच्या सुमारास दादांचे मॅनेजर जीतू भाई यांचा फोन आला. दादांची प्रकृती गंभीर असल्याचं कळल्यानंतर त्या रुग्णालयात पोहोचल्या.
अंतिम प्रक्रियेसाठी ॲम्ब्युलन्स मिळवताना मोठी धावपळ झाली. आणि तब्बल दोन तास त्या दादांच्या पार्थिवाजवळ एकट्या होत्या, असा दावा त्यांनी केला.
अखेर मित्रांच्या मदतीने दादांचे पार्थिव त्यांच्या कॉन्टेसा गाडीतून घरी नेण्यात आलं.
दादांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर आले. बाळासाहेब ठाकरे यांनीही दादांच्या पार्थिवाजवळ बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवला, अशी आठवण अनिता पाध्ये यांनी सांगितली.
ज्यांनी लाखो महाराष्ट्राला हसवलं, त्या दादांचा शेवट मात्र मन हेलावून टाकणारा होता.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.