मुंबईत Blinkit वर FDAची मोठी कारवाई; गोदामात झुरळं अन् Expired Food, Food License निलंबित!

Rokhthok Maharashtra 7 0

गोदामातील धक्कादायक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी थेट फूड लायसन्स निलंबित केलंय!
मालाड येथील Blinkit अर्थात Blink Commerce Pvt. Ltd. च्या गोदामाची ७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली.
या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळं, अस्वच्छता, गंजलेले रॅक आणि काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले आढळल्याचं FDAने नमूद केलं आहे.
इतकंच नाही तर कोल्ड स्टोरेजची स्वच्छताही समाधानकारक नसल्याचं समोर आलं. गोदामात मुदत संपलेले आणि पॅकेजिंगशी छेडछाड झाल्याचं दिसणारे खाद्यपदार्थ साठवलेले असल्याचंही तपासणीत आढळलं.
फळं आणि भाज्यांच्या साठ्यातही झुरळं आढळल्याचं FDAने सांगितलं आहे.
तसेच खाद्यपदार्थांच्या योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या FIFO आणि FEFO प्रणालीचं पालन होत नसल्याचंही समोर आलं.
या गंभीर त्रुटींमुळे संबंधित सुविधेचा फूड लायसन्स तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
मात्र, याचा अर्थ संपूर्ण Blinkit सेवा बंद झाली आहे असा नाही. ही कारवाई मालाडमधील संबंधित सुविधेपुरती आहे.
ग्राहकांनो, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताना एक्सपायरी डेट, पॅकेजची सील आणि खाद्यपदार्थाची स्थिती नक्की तपासा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.