शिरवळमध्ये काळरात्र! डिव्हायडरला धडकून कार ट्रकवर आदळली; चौघांचा जागीच मृत्यू

Rokhthok Maharashtra 4 0

शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात! भरधाव कार आधी डिव्हायडरला धडकली, पलटी झाली आणि त्यानंतर थेट ट्रकवर आदळली… या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत!
सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर रात्री सुमारे एक वाजता हा भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, टाटा नेक्सॉन कार चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कार पलटी होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत या चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण मावळ-तळेगाव परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने वाहने हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
महामार्गावरील वेग आणि वाहनावरील नियंत्रणाचा अभाव पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.