शाहरुख, अजय, टायगरला FDAची नोटीस! पानमसाला जाहिरातीवरून बॉलिवूड स्टार्स अडचणीत!

Rokhthok Maharashtra 11 0

महाराष्ट्रात भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अवैध गुटखा आणि पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात या कारवायांना वेग आल्याचं सांगितलं जात आहे.
आता या कारवाईचा मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे वळला आहे. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’ उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये काम केल्याप्रकरणी या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे. ‘इलायची’च्या जाहिरातीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे पानमसाल्याची जाहिरात केली जात असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे.
या प्रकरणी तिन्ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. शाहरुख खानच्या वांद्रे येथील ‘मन्नत’, अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी आणि टायगर श्रॉफच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
आता या नोटिसींवर तिन्ही कलाकार काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.