प्रियकरासाठी पतीचा काटा! गळा चिरून हत्या, १८ तास घरात मृतदेह; मध्यरात्री कसारा घाटात फेकला
प्रियकरासाठी पतीचा काटा; हत्येनंतर १८ तास घरात मृतदेह!
नाशिकमध्ये अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याच्या कारणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख वसंत गोरखनाथ सातपुते अशी झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वसंत सातपुते यांच्या मद्यपान आणि जुगाराच्या सवयींसोबतच पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांमध्ये ते अडथळा ठरत असल्याचा संशय आहे.
याच कारणातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. वसंत सातपुते यांचा गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल १८ तास घरातच ठेवण्यात आला.
त्यानंतर मध्यरात्री कारमधून मृतदेह कसारा घाटात नेण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तेथे फेकून देण्यात आला.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत कसारा घाटातून मृतदेह शोधून काढला.
या प्रकरणात हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा यांच्यासह अन्य दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.
या हत्येमागचा नेमका कट काय होता? आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.





