दारू पिताना वाद अन् हनुमंत शितोळेंची हत्या; कासारसाईत खळबळ

Rokhthok Maharashtra 72 0

पुण्यातील कासारसाई येथे दारू पिताना झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी सायंकाळी कासारसाई-कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरासमोरील वन विभागाच्या जागेत हनुमंत सोपान शितोळे आणि जयवंता भगवंत तिडके हे दोघे दारू पीत होते.
दारू प्यायल्यानंतर क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात हनुमंत शितोळे यांनी जयवंता तिडके यांना मारहाण करून त्यांचा हात पिरगळल्याचा आरोप आहे.
याचा राग आल्याने जयवंता तिडके यांनी जवळच पडलेला दगड उचलून हनुमंत शितोळे यांच्या डोक्यात आणि छातीत जोरदार मारल्याचा आरोप आहे. यात हनुमंत शितोळे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयूर शितोळे यांच्या फिर्यादीवरून जयवंता तिडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.