पुण्यात पती-पत्नीच्या वादातून गोळीबार; पती गंभीर जखमी!

Rokhthok Maharashtra 4 0

पुण्यातील कसबा पेठ परिसरात पती-पत्नीच्या वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमी अभिजीत शिंगोटे आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्यात सोमवारी सकाळी वाद झाला. त्यानंतर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि अभिजीत यांच्या छातीत गोळी लागली.
मात्र, या प्रकरणात दोघांचे दावे वेगवेगळे आहेत. पत्नी कावेरी यांनी अभिजीत यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अभिजीत यांनी पत्नीने वादादरम्यान आपल्यावर गोळी झाडल्याचा आरोप केला आहे.
या विरोधाभासी दाव्यांमुळे गोळीबार नेमका कोणी आणि कशामुळे केला? याचा पोलीस तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.