फुरसुंगी-उरुळी नगरपरिषदेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

Rokhthok Maharashtra 16 0

 

नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य; विकासासाठी निधी आणण्याचा लोकप्रतिनिधींचा निर्धार

फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचा द्वितीय वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना नागरी सुविधा आणि विकासकामांना गती देण्याबरोबरच नागरिकांच्या प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

“फुरसुंगी व उरुळी देवाची येथील नागरी समस्या सोडविणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी सांगितले.

तर “दोन्ही गावांतील विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणण्याचा मानस आहे,” असे नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले.

वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

फोटो ओळ : द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक.

रोखठोक न्यूज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.