बहिणीच्या छेडछाडीच्या संशयातून तरुणाचा खून; तिघांना अटक!

Rokhthok Maharashtra 4 0

पुण्यातील वाकडमध्ये बहिणीची छेड काढल्याच्या संशयातून ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव मारोती बाळासाहेब बनसोडे, वय ३५, असे असून ते मूळचे बीड जिल्ह्यातील होते. सध्या ते चिंचवड परिसरात राहत होते.
ही घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेत घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मारोती बनसोडे यांनी बहिणीची छेड काढल्याचा आरोपींना संशय होता. याच कारणावरून आरोपींनी त्यांना गाठून जाब विचारला. त्यानंतर झालेल्या वादातून मारोती यांच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर आणि गुप्त भागावर हत्याराने वार करण्यात आल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी मारोती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी अमित दशरथ साळुंखे, किशोर सुभाष वाघमारे आणि भारत संजय पवार या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर भोकरे करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.