1. पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार वेगवान? मांजरीपासून 2 नवीन मार्गिका!

Rokhthok Maharashtra 7 0

पुणे-सोलापूर-वाडी रेल्वेमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी मांजरी स्थानकापासून तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुमारे ४१२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यात ९२ एकर, तर सोलापूर जिल्ह्यात सुमारे ५३० एकर जमिनीचे संपादन केले जात आहे.
सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे.
नवीन मार्गिकांवरून सुमारे ३२ प्रवासी रेल्वे आणि ४० हून अधिक मालगाड्या धावू शकतील. त्यामुळे पुणे-सोलापूर-वाडी मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक होते. विशेषतः होटगी आणि कुडगी येथील NTPC प्रकल्पांसाठी कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे मालगाड्यांमुळे प्रवासी रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
नवीन मार्गिका मांजरीपासून पुणे-दौंड-कुर्डुवाडीपर्यंत अपलाइनच्या बाजूने जाणार आहेत. तर सोलापूरजवळ त्या शहराबाहेरून नेऊन रेल्वे स्थानकाला बायपास करत तिलाटी स्थानकाजवळ विद्यमान नेटवर्कशी जोडण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी प्रति किलोमीटर सुमारे ३९ कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.