बीडमध्ये शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखांचा मृत्यू; राहत्या घरी आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
बीडमधून मोठी आणि दुःखद बातमी समोर आली आहे.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजीराव शिंदे यांच्या निधनाने स्थानिक राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
शिवाजीराव शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांच्या निधनामुळे बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.





