*अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताने, अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियान*

Rokhthok Maharashtra 17 0

 

हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून, अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे पर्यावरणपूरक प्लास्टिक संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत दरमहा संकलित होणारे प्लास्टिक पुनर्वापरासाठी ‘पूर्णम इकोव्हिजन’ या संस्थेकडे सुपूर्द केले जाते. याच उपक्रमांतर्गत महाविद्यालयात संकलित केलेले १५ किलो प्लास्टिक दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पूर्णम इकोव्हिजन’ या संस्थेकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. पर्यावरणाप्रती अजितदादा पवार यांची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या पर्यावरणस्नेही विचारांची प्रेरणा समाजाला मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात प्रत्येक महिन्याच्या २२ ते २८ तारखेदरम्यान हा उपक्रम सातत्याने पुढे सुरू ठेवण्यात आला आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दादांचे पर्यावरणविषयक प्रेम होते. पर्यावरणाप्रती असणारी त्यांची हीच भूमिका व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच, त्यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य सूधीर रोकडे, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ. रमाकांत जोशी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण रणदिवे, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ धीरज देशमुख, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. सय्यद प्रा. सुनीता सायकर, प्रा. माहेश्वरी जाधव, प्रा. अर्चना श्रीचिप्पा, प्रा. डोंगरे प्रतिभा, प्रा. प्रज्ञा थोरात, प्रा. काजल घुले, प्रा. मोहिनी ठवाळ, प्रा. शेळके, प्रा. मदने आणि प्लास्टिक संकलन व हस्तांतरण अभियानाच्या समन्वयक सुनीता दानाई- तांभाळे, चांगदेव पोमन, बाळासाहेब खोमणे, काशिनाथ हगवणे, चंदू साठे, प्रमोद डोके, अमोल कचरे, सौरभ भांडवलकर तसेच ‘पूर्णम इकोव्हिजन’ संस्थेच्या समन्वयक महाले सायली इत्यादी उपस्थित होते. यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.