परदेशी नागरिकाला घर भाड्याने देणं भोवलं…आंबेगावात घरमालकिणीवर गुन्हा दाखल!

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यात आंबेगाव बुद्रुक परिसरात परदेशी नागरिकाला विनापरवाना घर भाड्याने देणं घरमालकिणीला चांगलंच महागात पडलं आहे.
आंबेगाव खुर्द येथील वाघजाई नगरमधील ‘भाग्यश्री’ बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या घरमालकीण अंजना शिनगारे यांनी युगांडा देशाची नागरिक नमन्या नताशा हिला फ्लॅट भाड्याने दिला होता.मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार, घर भाड्याने देताना नोंदणीकृत भाडेकरार करण्यात आला नव्हता, तसेच संबंधित परदेशी नागरिकाची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली नव्हती. केवळ नोटरी करार करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी तपासणी केली. त्यानंतर पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंजना शिनगारे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील घरमालकांनी परदेशी नागरिक किंवा इतर भाडेकरूंना घर देताना पोलिसांना आवश्यक माहिती देणे आणि लागू असलेल्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.