‘मफलरवाला नेता’ कोण? १० ऑक्टोबरला पर्दाफाश!

Rokhthok Maharashtra 8 0

‘मफलरवाला नेता’ कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवणाऱ्या एका बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.या नेत्याने एका कार्यक्रमात डिझाइनचा मफलर घातला होता, त्यामुळे आपण त्यांना ‘मफलरवाला नेता’ म्हणत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.अजित पवार यांच्या अपघाताला आठ महिने उलटूनही सरकार आणि सीआयडीकडून अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विमानातील घडामोडी, ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तसेच गुन्हेगारी तपासाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
१० ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत या नेत्याचे नाव आणि छायाचित्र जाहीर करू, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
व्हीएसआर कंपनीला आणि संबंधित व्यक्तीला सत्तेचा वापर करून संरक्षण दिल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ नेमके कोणते पुरावे आहेत, याचा तपशील त्यांनी अद्याप सार्वजनिक केलेला नाही.
दरम्यान, या प्रकरणातील तपास, ब्लॅक बॉक्स आणि विमान अपघाताशी संबंधित बाबींवर रोहित पवार यांनी यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आता १० ऑक्टोबरला ‘मफलरवाला नेता’ म्हणून कोणाचे नाव समोर येणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.