मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्यासाठी पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Rokhthok Maharashtra 13 0

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी पुण्यात काँग्रेसचं तीव्र आंदोलन करण्यात आलं.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत लोकशाहीच्या रक्षणासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत विविध निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात पुणे पूर्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी, नगरसेवक अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, भाऊसाहेब आजबे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिव मंत्री, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका सुमय्या नदाफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, सीमा सावंत, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, आसिफ शेख, जुबेरबाबू शेख, गौरव बालांडे, विठ्ठल गायकवाड, सुरेश कांबळे, सतीश पवार आणि प्राजक्ता जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.