उद्योजकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला! 2 दिवसांपूर्वी मागितली होती 5 लाखांची खंडणी; CCTV VIDEO

Rokhthok Maharashtra 13 0

पुण्यात उद्योजकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर बुधवारी दुपारी दोन जणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लोणकर ऑफिसमधून बाहेर पडून आपल्या गाडीकडे जात असताना गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे हे दोघे कोयते घेऊन त्यांच्या दिशेने धावत आले.
हल्लेखोरांना पाहून लोणकर यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच लोणकर यांच्याकडे चार ते पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामागचं नेमकं कारण आणि आरोपींची भूमिका याचा पोलीस तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.