पत्नी-वडिलांच्या संबंधांचा संशय; संतापलेल्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!

Rokhthok Maharashtra 4 0

डोंबिवली पूर्वेकडील पिसवली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाने आपल्याच वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री याच संशयावरून घरात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर समीरने स्वयंपाकघरातील चाकूने आपले वडील किशोर यांच्यावर वार केले. या हल्ल्यात किशोर यांचा मृत्यू झाला.
घटनेतील आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी संशयित आरोपी समीरला अटक केली असून, हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशय आणि कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.