*भोरच्या निखिल गाडे यांची जागतिक विश्वविक्रमात नोंद! ५० पैशांच्या ५ हजार नाण्यांचा अनोखा संग्रह!*

Rokhthok Maharashtra 9 0

 

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील निखिल दत्तात्रय गाडे यांनी आपल्या अनोख्या नाणेसंग्रहातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या ५० पैशांच्या तब्बल ५ हजार नाण्यांच्या संग्रहाची बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि फॉरेव्हर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही निखिल गाडे यांच्या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

या यशासाठी त्यांना त्यांचे वडील दत्तात्रय रघुनाथ गाडे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक, तसेच भाऊ शाम दत्तात्रय गाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नाणेसंग्रहाच्या छंदातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या निखिल गाडे यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.