सिंधुदुर्ग हादरलं! महिला पोलीस स्मिता माने यांच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; बहिणीचे गंभीर आरोप
सिंधुदुर्ग हादरलं! महिला पोलीस स्मिता माने यांच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक!
सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे! महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने याला पोलिसांनी अटक केली आहे.
स्मिता माने या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यानंतर बिडवाडी-हुंबरणे परिसरातील दाट जंगलात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, स्मिता माने यांच्या बहिणीने पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच त्रासातून त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन माने याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
महिला पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूचं गूढ उकलणार का? या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा रोखठोक महाराष्ट्र न्यूज!





