*अण्णासाहेब मगर महाविद्यालयात फिल्म कल्बमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिला ‘नटसम्राट’..अभिनेते नाना पाटेकर यांना आदरांजली*

Rokhthok Maharashtra 7 0

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात फिल्म कल्बमध्ये मराठी विभागाच्यावतीने ‘नटसम्राट’ चित्रपट
विद्यार्थ्याना दाखविण्यात आला. या प्रसंगी दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात फिल्म कल्बची स्थापना करण्यात आली असून यामध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या विषयातील अभिजात कलाकृती दाखविण्यात येतात. मराठी विभागाच्यावतीने ‘नटसम्राट’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

महाविद्यालयाचे आयक्यूएसी प्रमुख डॉ. लतेश निकम यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्याचा आढावा घेतला तसेच ‘नटसम्राट’ नाटक आणि चित्रपट या विषयी विवेचन केले. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विषय विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा. असे सांगतचित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

या उपक्रमास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. चित्रपट पाहिल्यानंतर पाहिल्यावर विद्यार्थ्यांनी त्यावर चर्चा केली.

या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. सुधीर रोकडे, डॉ. किसन गाढवे, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. वंदना सोनवले, प्रा. सूरज काळे, प्रा. सुनील भोपे आदी उपस्थित होते.

मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण ससाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. नाना झगडे यांनी सूत्रसंचालन यांनी केले तर आभार प्रा. वंदना सोनवले यांनी मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.