पुणे न्यायालयात राहुल गांधी प्रकरणाची सुनावणी; सावरकर बदनामी खटल्यात उलटतपासणीदरम्यान महत्त्वपूर्ण मुद्दे चर्चेत!

Rokhthok Maharashtra 4 0

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात, राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी फिर्यादीच्या उलटतपासणीदरम्यान महत्त्वपूर्ण कबुली नोंदवून घेतली होती..

“नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते,” या मुद्द्याबाबत पुणे न्यायालयातील उलटतपासणीने ऐतिहासिक आणि राजकीय चर्चेला महत्त्वपूर्ण वळण दिले.

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नथुराम गोडसे यांच्या संबंधांबाबत पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला हा मुद्दा अनेक प्रश्न उपस्थित करतो.

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहिर रित्या प्रथमच कबुली देत नथुराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच सदस्य असल्याबाबत जाहिर केले आहे.

न्यायालयात प्रश्न विचारले जातात, साक्षीची पडताळणी होते आणि इतिहासातील दाव्यांची कसोटी लागली..

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.