बालेवाडी येथील ‘४३ प्रायव्हेट ड्राईव्ह’ मधील म्हाडा गृहप्रकल्पाचा रस्ता तात्काळ मोकळा करा; अन्यथा विकासक सचिन भंडारी व आर्किटेक्टवर गुन्हा दाखल करा – रविराज काळेंची मागणी

Rokhthok Maharashtra 3 0

​पुणे: बालेवाडी येथील ‘४३ प्रायव्हेट ड्राईव्ह’ या प्रकल्पातील ‘पुणे म्हाडा सोडत सप्टेंबर २०२५’ अंतर्गत लॉटरीद्वारे सदनिका (फ्लॅट्स) प्राप्त झालेल्या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारा प्रवेश रस्ता अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक सचिन भंडारी आणि आर्किटेक्टवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग (झोन-३) कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

​म्हाडा सोडतीद्वारे घर मिळालेल्या फ्लॅटधारकांनी रस्त्याच्या उपलब्धतेसाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असली, तरी रस्ता मोकळा करण्याबाबत आजपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
​
प्रमुख मागण्या:
1) बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट यांनी मंजुरी मिळवताना सादर केलेल्या प्लॅनमध्ये दर्शवलेला रस्ता तात्काळ नागरिकांसाठी खुला करण्यात यावा.
2)नियमानुसार रस्ता उपलब्ध करून न दिल्यास संबंधित आर्किटेक्टचे लायसन्स रद्द करण्यात यावे.
3) सचिन भंडारी या बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.
​याप्रकरणी महापालिकेने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल लेखी उत्तराद्वारे प्रशासनाने सादर करावा, अशी मागणीही रविराज काळे यांनी केली आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.