पायल झांबरे मृत्यू प्रकरणाला नवं वळण! सासू-पतीवर मारहाणीचे गंभीर आरोप
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा धक्कादायक खुलासा! आत्महत्येच्या आदल्या रात्री सासू-सुनेत वाद, मारहाणीचाही गंभीर आरोप!
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पायलच्या भावाने माध्यमांशी बोलताना सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
भावाने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आदल्या रात्री पायलचा सासू आणि पतीसोबत जोरदार वाद झाला होता. यावेळी तिला मारहाण करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पायल घाबरलेल्या अवस्थेत माहेरी आली होती. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तिने भावाला सांगितलं होतं, असंही त्याने म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी पायल बेपत्ता असल्याचा फोन आल्यानंतर माहेरचे नातेवाईक झांबरे यांच्या घरी पोहोचले. मात्र, पायलला शोधण्यासाठी स्वारगेटला जात असल्याचं सांगून सासरची मंडळी घराबाहेर पडल्याचा आरोप भावाने केला आहे.
दरम्यान, पायलच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी झांबरे पॅलेसवर दगडफेक आणि तोडफोड केली होती.
पायलला चार वर्षांची मुलगी असून, या प्रकरणात कौटुंबिक छळ आणि मारहाणीच्या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत.
आदल्या रात्री नेमकं काय घडलं? पायलच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत!





