२९ वर्षीय आयटी इंजिनिअरचा मृत्यू! सोनं-पैशांसाठी छळाचा आरोप
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू! २९ वर्षीय आयटी इंजिनिअर पायल झांबरेने जीवन संपवलं; माहेरच्यांचे गंभीर आरोप!
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय पायल झांबरे या विवाहित महिलेचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. पायल या उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर असून, पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेस व्यावसायिक कुटुंबाच्या सून होत्या.
या घटनेनंतर पायल यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. माहेराहून पैसे आणि सोनं आणण्यासाठी पायल यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी महर्षीनगर येथील झांबरे पॅलेस परिसरात तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी पायल यांचे पती अक्षय झांबरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला? माहेरच्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येणार का? आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे.





