मांड नदीच्या पात्रात कोंबड्यांचे अवशेष! उंब्रज-शिवडेकर संतप्त, प्रशासन झोपलेय का?
मांड नदीला माता मानायचे की कचरा टाकण्याचे ठिकाण? उंब्रज आणि शिवडे गावांच्या मध्यभागी असलेल्या मांड नदीच्या पात्रात कोंबड्यांचे अवशेष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नदीच्या पात्रात टाकण्यात आलेल्या या अवशेषांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
एकीकडे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे नदीपात्रात अशा प्रकारे घाण टाकली जात आहे. मग प्रशासन नेमके करतेय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नदीपात्रात कोंबड्यांचे अवशेष टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तसेच प्रशासनाने तातडीने नदीपात्राची स्वच्छता करावी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी उंब्रज आणि शिवडे परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नदी ही आपली संपत्ती आहे, कचराकुंडी नाही! मांड नदी वाचवा, पर्यावरण जपा आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवा!





