पुण्यात प्लंज पबवर मोठी कारवाई! पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा सुरू केला पब

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यातील प्लंज पबवर पोलिसांची मोठी कारवाई! पोलिसांची पाठ फिरताच पब पुन्हा सुरू; नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेशापर्यंत बंद!
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ‘प्लंज’ म्हणजेच Plunge पबवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निर्धारित वेळेचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवल्याप्रकरणी हा पब पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंतच पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, प्लंज पब रात्री दोन वाजल्यानंतरही सुरू असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, रात्री दीड वाजता पोलीस मार्शल तपासणीसाठी पबमध्ये गेले असता व्यवस्थापनाने पब बंद असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच काही वेळातच पब पुन्हा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळताच त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्लंज पबवर कारवाई करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत पब बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.