वंदे भारतमध्ये नातेवाईकांना सोडायला गेले अन् स्वतःच अडकले! १२ जणांना ३६ हजारांचा दंड

Rokhthok Maharashtra 5 0

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नातेवाईकांना सोडायला गेले अन् स्वतःच अडकले! १२ जणांना तब्बल ३६ हजार रुपयांचा दंड भरावा लागला! उत्तर प्रदेशातील या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकावर काही जण आपल्या नातेवाईकांना वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसवण्यासाठी गेले होते.
नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवल्यानंतर गप्पांच्या नादात हे १२ जणही ट्रेनमध्येच थांबले. मात्र, अचानक ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आणि गाडी सुरू झाली. त्यामुळे नातेवाईकांना निरोप द्यायला आलेले हे १२ जण ट्रेनमध्येच अडकले.
कानपूरहून सुटलेली ट्रेन तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास करून इटावा स्थानकात पोहोचली. या प्रवाशांकडे रेल्वेची तिकिटे नव्हती. ट्रेन थांबवण्यासाठी त्यांनी चेन खेचण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
अखेर इटावा स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने या १२ जणांना खाली उतरवलं. आरपीएफ निरीक्षक दिनेश कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म तिकीट नसणे आणि गोंधळ घालणे यामुळे प्रत्येकी ३ हजार रुपये, असा एकूण ३६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
नातेवाईकांना सोडायला गेले आणि स्वतःच महागड्या प्रवासात अडकले, अशी चर्चा आता रंगली आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.