52 सोन्याची जहाजं, 38 विमानं अन् 300 सुपरकार्स! कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत राजा?

Rokhthok Maharashtra 3 0

५२ सोन्याची जहाजं, ३८ विमानं, ३०० सुपरकार्स आणि तब्बल ४३ अब्ज डॉलरची संपत्ती! जगातील सर्वात श्रीमंत राजा कोण, माहिती आहे का? विशेष म्हणजे या राजाचं नाव प्रभू श्रीरामांशी जोडलं गेलं आहे!
हा राजा दुसऱ्या कोणत्या देशाचा नसून थायलंडचा आहे. थायलंडचे सध्याचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांना ‘राम दशम’ म्हणजेच ‘राम दहावे’ किंवा ‘Rama X’ म्हणून ओळखलं जातं.
थायलंडमध्ये रामायणाला ‘रामाकियन’ म्हटलं जातं. भारतीय रामायणाचा या देशाच्या संस्कृती, कला आणि साहित्यावर मोठा प्रभाव आहे. विशेष म्हणजे थायलंडच्या चक्री राजवंशातील राजांच्या नावापुढे ‘राम’ ही पदवी लावण्याची परंपरा आहे. ही परंपरा 1782 पासून सुरू झाली.
2016 मध्ये वडील राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या निधनानंतर महा वजिरालोंगकोर्न यांनी राजसिंहासनाची सूत्रं हाती घेतली.
माध्यमांमधील वृत्तांनुसार, त्यांची संपत्ती सुमारे 43 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या मालकीच्या 17 हजारांहून अधिक मालमत्ता, 300 पेक्षा जास्त महागड्या गाड्या, 38 विमानं आणि हेलिकॉप्टर्स असल्याचं सांगितलं जातं. एवढंच नाही, तर 52 सोन्याच्या शाही नौकाही त्यांच्या ताफ्यात आहेत.
दरम्यान, ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे सुमारे 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह श्रीमंत राजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं जातं.
म्हणजेच प्रभू श्रीरामांशी नावाने जोडलेला थायलंडचा हा राजा संपत्तीच्या बाबतीतही जगभरात चर्चेत आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.