इन्स्टावर मैत्री, झारखंडमधून थेट मुंबई! अल्पवयीन मुलीसोबत पुढे काय घडलं?

Rokhthok Maharashtra 4 0

इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, मैत्रीच्या ओढीने झारखंडमधून थेट मुंबई गाठली… पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक आहे!
झारखंडमधील बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी घरातून निघाली आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनने थेट दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. जालन्यात राहणारा तिचा मित्र मुंबईत भेटायला येईल, अशी तिला अपेक्षा होती.
दादर स्टेशनवर बसून ती मित्राची वाट पाहत होती. दरम्यान, तिने मुंबईतील काही फोटो कुटुंबीयांना पाठवले आणि मुलगी मुंबईत असल्याचं समजताच कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क साधला.
रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि बालकल्याण संस्थांनी संयुक्त शोधमोहीम राबवत प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ जवळ मुलीला सुखरूप शोधून काढलं.
तिची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आलं असून, कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा समोर आलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.