दाऊद इब्राहिम भारतात शरण येणार होता? ३ अटींमुळे आत्मसमर्पणाची चर्चा फिस्कटली!

Rokhthok Maharashtra 5 0

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात आत्मसमर्पण करण्यास तयार होता… मात्र त्याच्या तीन अटींमुळे संपूर्ण चर्चा फिस्कटल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे!
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि सीबीआयचे माजी अधिकारी नीरज कुमार यांनी दाऊदच्या आत्मसमर्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेचा पडद्यामागील घटनाक्रम उलगडला आहे.
१९९० च्या दशकाच्या मध्यात दाऊदशी आत्मसमर्पणाबाबत चर्चा झाली होती. त्यासाठी मनीष लाला नावाच्या व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली. दाऊद त्याला आपला ‘लॉ मिनिस्टर’ म्हणत असल्याचा खुलासा नीरज कुमार यांनी केला.
मात्र दाऊदला नजरकैदेत ठेवण्यात यावं, केवळ १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातच खटला चालवावा आणि इतर गुन्ह्यांबाबत कारवाई होऊ नये, अशा अटी त्याने मांडल्याचं सांगण्यात आलं.
या अटी भारतीय तपास यंत्रणांना मान्य नव्हत्या आणि त्यामुळे दाऊदच्या आत्मसमर्पणाची चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.