शेतकरी पती-पत्नीला मिळणार दरमहा ₹6,000 पेन्शन! सरकारची योजना, नोंदणी कशी कराल?

Rokhthok Maharashtra 6 0

शेतकरी पती-पत्नीला मिळू शकतात दरमहा ६ हजार रुपये! केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेतून वृद्धापकाळात शेतकऱ्यांना पेन्शनचा आर्थिक आधार मिळणार आहे.
या योजनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजेच पती आणि पत्नी दोघेही या योजनेसाठी पात्र असतील, तर दोघांना मिळून महिन्याला ६ हजार रुपये, तर वर्षाला ७२ हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचं वय १८ ते ४० वर्षे असणं आवश्यक आहे, तसेच २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी पात्र ठरू शकतात.
वयानुसार दरमहा ५५ ते २०० रुपये हप्ता भरावा लागतो आणि शेतकऱ्याइतकाच योगदान सरकारही जमा करतं.
नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सीएससी केंद्रावर अर्ज करता येतो.
म्हणूनच पात्र शेतकऱ्यांनी या योजनेची माहिती घेऊन नोंदणी करावी आणि वृद्धापकाळासाठी आर्थिक आधार मिळवावा.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.