डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त, ९ नमुन्यांची तपासणी

Rokhthok Maharashtra 5 0

डी-मार्टच्या गोदामावर एफडीएची मोठी कारवाई! तब्बल ५० लाख रुपयांचं खाद्यतेल जप्त करण्यात आलं असून, नऊ नमुन्यांचे प्रयोगशाळेतील अहवाल आता समोर येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, आंबी गावातील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड अर्थात डी-मार्टच्या साठवण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. या तपासणीत तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आलं असून, त्याची किंमत ५० लाख २७ हजार ८९३ रुपये आहे.
जप्त केलेल्या तेलामध्ये आधार सूर्यफूल तेल, फॉर्च्यून राइस ब्रान तेल, पतंजली मोहरीचे तेल आणि सफोला कंपनीच्या मोहरी व शेंगदाणा तेलाचा समावेश आहे.
खाद्यतेलाचा दर्जा आणि उत्पादनांवरील लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एफडीएने एकूण नऊ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
मात्र, तेल निकृष्ट दर्जाचं आहे किंवा लेबलिंगमध्ये नियमांचं उल्लंघन झालं आहे, हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.