नाशिक हादरलं! निवृत्त RTO अधिकाऱ्याने घरातच संपवलं जीवन
नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरात ही घटना घडली. घरातून गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.
निवृत्त RTO अधिकाऱ्याच्या मृत्यूमुळे प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.





