FDA चा मोठा दणका! अस्वच्छ किचन, खाद्यपदार्थांत कृत्रिम रंग; पुण्यातील ८ हॉटेलांचे परवाने निलंबित!

Rokhthok Maharashtra 5 0

पुण्यात FDA चा धडाका! अस्वच्छ किचन, खाद्यपदार्थांत कृत्रिम रंग; आठ हॉटेलांचे परवाने निलंबित!

पुणेकरांनो, हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर ही बातमी नक्की पाहा!

पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने मोठी कारवाई केली आहे.

पुणे स्टेशन, कॅम्प, एम. जी. रोड, हडपसर आणि कोंढवा परिसरातील तब्बल २० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये आठ हॉटेल्समध्ये गंभीर अनियमितता आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

या तपासणीत अस्वच्छ स्वयंपाकघर, कीटकांचा प्रादुर्भाव, खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर आढळला. विशेष म्हणजे मेट्रो रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांसह MSG चा अधिक वापर केल्याचेही निदर्शनास आले.

कारवाई झालेल्या हॉटेल्समध्ये मेट्रो रेस्टॉरंट, शिवाय कॉर्नर, सहाना व्हेज रेस्टॉरंट, ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज, द बर्गर बार्न कॅफे, महादेव फूड्स आणि फिरोज केटरर्स यांचा समावेश आहे.

FDA च्या पथकाने ही कारवाई सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकांवर प्रशासनाचा हा दणका! मात्र, शहरातील इतर हॉटेल्सचीही नियमित तपासणी होणार का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.