हडपसरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य दीपोत्सव! संत सावता महाराज मंदिरात भक्तांची मांदियाळी!

Rokhthok Maharashtra 6 0

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हडपसर परिसरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढून दीपोत्सवाची शोभा वाढवण्यात आली. हडपसरमधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार श्री. दिनेश चव्हाण यांनी कोणतेही मानधन न घेता मोफत रांगोळी साकारून आपली सेवा अर्पण केली. त्यांच्या या सेवाभावी योगदानाबद्दल मंदिर प्रशासनाकडून त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या दीपोत्सवासाठी हडपसर परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला-भगिनी, मंदिराचे विश्वस्त आणि सेवेकरी उपस्थित होते.
दीपांच्या प्रकाशाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.