रोहित पवारांची नागपुरात गुप्त बैठक! सुप्रिया सुळे नाराज? राष्ट्रवादीत मोठी खळबळ!

Rokhthok Maharashtra 4 0

 रोहित पवारांच्या नागपुरातील गुप्त बैठकीने राष्ट्रवादीत खळबळ! पक्षात नेमकं चाललंय तरी काय?
आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांचे फोटो न वापरता रोहित पवार सरकारविरोधात भूमिका घेत असल्याने पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचीदेखील नाराजी असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, नागपुरात रोहित पवार यांनी विदर्भातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. ४ तारखेपासून निघणाऱ्या शेगाव ते नागपूर शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. या मोर्चाबाबत पक्षातील नेत्यांना कसं विश्वासात घ्यायचं, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, पक्षातील वरिष्ठांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा केल्याने सुप्रिया सुळे नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीची भाजपशी वाढती जवळीक आणि रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका यामुळे पक्षात दोन गट पडल्याचं बोललं जात आहे.
यावर रोहित पवार यांनी मात्र हा शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय हक्कांचा लढा असल्याचं स्पष्ट केलं आहे. यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर असल्याचं सांगत त्यांनी १४ मागण्यांसाठी सर्व पक्ष आणि संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.
आता रोहित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.