बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांना जाहीर

Rokhthok Maharashtra 5 0

पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) वतीने देण्यात येणारा ‘अप्रिसिएशन अवॉर्ड फॉर स्टेट चेअरमन २०२५-२६’ हा राष्ट्रीय पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांना जाहीर झाला आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ८५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. येत्या १९ डिसेंबरला जमशेदपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

‘बीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्यासह पदाधिकारी रणजित मोरे, शिवराम थोरवे, शिवकुमार भल्ला, दत्तात्रय मुळे, भारत वाघ, सर्व कार्यकारिणी व अन्य शाखेच्या अध्यक्षांनी जाधव यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून बीएआय ही संस्था ओळखली जाते. १९४१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची देशभरात २५० केंद्रे असून, दीड लाखापेक्षा अधिक सदस्य आहेत.

जगन्नाथ जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन केले होते. तसेच सरकारी धोरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.