मुंबई

बदलापुर शहर प्रवासी संघटनेच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द– संजय ससाणे

कल्याण- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
बदलापुर शहरात रेल्वे सोबत समांतर परिवहन सेवा सुरु व्हावी,तसेच रेल्वे सेवा बंद पडल्यानंतर अशा आपत्कालीन वेळेत परिवहन सेवा सुरु करावी,यासाठी व इतर विविध मागण्यासहीत एक निवेदन बदलापुर शहर प्रवासी संटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्या नेत्रुत्वाखाली व इतर कोअर कमिटी सदस्यांसमवेत नुकताच कल्याण येथील आरटीओ कार्यालयात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांजकडे सादर करण्यात आले.या चर्चेदरम्यान सहा आसनी गाडी चालु करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन ही मागणी मान्य करण्यात आली.तसेच इतरही बदलापुर शहर प्रवासी संघटनेच्या मागण्या व समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द आहोत,असे अधिकारी संजय ससाणे यांनी स्पष्ट केले.ततपुर्वी स्टँन्डची जागा,कीती गाड्या,किती कीलो मिटर अंतर,भाडे यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल,अस सुचित केले.तसेच प्रवासी संख्या लक्षात घेऊन केडीएमसी मार्फत पलावा ते बदलापुर,तसेच पनवेल परिवहन सेवेकडुन पनवेल-बदलापुर अशा बस सेवा सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला.प्रवासी जास्त प्रमाणात असतील तर इतर एजन्सी गाड्या सोडण्यास तयार असेल तर आपण तात्काळ होकार देऊ,असा धोरणात्मक निर्णय अधिकारी श्री.ससाणे यांनी घेतला,तस आश्वासनही दीले.बदलापुर शहरातील प्रवाशांना परवडेल अशा दरांमध्ये तात्काळ सहा आसनी रिक्षा सुरु करण्याबाबत निर्णय झाला.इच्छुक वाहन चालकांनी परमिटसाठी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव व कोअर कमिटी सदस्य प्रशांत पालांडे यांच्याशी संपर्क साधावा.चर्चेमध्ये कोअर कमिटी सदस्य संगिता चेंदवणकर,प्रशांत पालांडे,राजेंद्र नरसाळे,सचिन हाटे यांनी भाग घेतला.तसेच सौ.भावना तांदुळे,चंद्रकांत पाटील,कदम,भरत म्हसकर,गुरुनाथ तिरपणकर हे सदस्यही उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 months ago

This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x