देश-विदेश

हर्षवर्धन पाटील यांची बुधवारी राजकीय भूमिका ठरणार ; इंदापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा

रेडा- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 4) इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. इंदापूर येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी एक वाजता हा मेळावा होणार आहे.
लोकसभेला आम्हाला मदत करा, आम्ही विधानसभेची जागा सोडू, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना दिल्याची चर्चा आहे; परंतु आता इंदापूर विधानसभेचे जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याचे संकेत असल्याने इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विश्‍वासघातकी राजकारणामुळे संतप्त झाले आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे, त्यामुळे या मेळाव्यात पाटील काय निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Good replies in return of this query with genuine arguments and describing everything about that.

11 days ago

very informative articles or reviews at this time.

9 days ago

This is really interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post. Also, I’ve shared your site in my social networks!

3 days ago

I very delighted to find this internet site on bing, just what I was searching for as well saved to fav

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x