देश-विदेश

आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले; भाजपला मतदान करू नका ! नाही तर सर्वाना चहा विकायला लावतील !

दिल्ली (रोखठोक महाराष्ट्र न्यूजलाईन)- उत्तराखंडमध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, त्याने आत्महत्य करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिला. तसेच आपल्या हलाखीच्या परिस्थिती, कर्जबाजारीपणा आणि यातूनच आत्महत्येसाठी सरकारला जबाबदार धरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना ही घटना समोर आली. शेतकऱ्याने सुसाइड नोटमध्ये भाजपला मतदान करू नका असे आवाहन केले आहे.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव ईश्वरचंद शर्मा (65) असे आहे. तसेच तो उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने सोमवारी (8 एप्रिल) विष प्राषण करून आत्महत्या केली. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार ईश्वरचंद शर्मा यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले, ‘भाजप सरकारने गेल्या 5 वर्षांत शेतकऱ्यांना बरबाद केले आहे. त्यांना मतदान करू नका, अन्यथा ते सर्वांना चहा विकायला लावतील.’ स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तो पत्र जप्त केला आहे. सध्या या पत्राची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आधीच कर्जबाजारी झालेले शर्मा यांना एक एजंट ब्लॅकमेल करत होता. त्यांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी त्याला गॅरन्टर म्हणून एक ब्लँक चेक दिला होता. त्याच चेकवरून पीक विक्रीनंतर आलेला बँकेतील सर्व पैसा काढून घेऊ अशा धमक्या तो एजंट शर्मा यांना देत होता,त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Hi i am kavin, its my first occasion to commenting anywhere,
when i read this piece of writing i thought i could also
make comment due to this sensible piece of writing.

9 months ago

Heya i am for the first time here. I came across this board and
I in finding It truly helpful & it helped me out a lot.
I hope to present something back and help others like you helped me.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x